GST on Room Rent: घरभाड्यावर कोणाला भरावा लागणार 18 टक्के GST; जाणून घ्या सविस्तर

140

जीएसटी परिषदेने लागू केलेल्या नव्या जीएसटी करानंतर सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यातच आता देशभरातील घरभाड्यावर 18 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, हा जीएसटी सरसकट सगळ्यांना भरावा लागणार नाही, असेही करविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.

सर्व भाडेकरुंना घरभाड्यावर 18 टक्के जीएसटी लागणार नसल्याचे, करविषय अभ्यासक संकेत देसाई यांनी सांगितले. ज्यांच्याकडे अधिकृत जीएसटी नंबर आहे त्याच भाडेकरुंना आपल्या घर भाड्यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फारसा तोटा सहन करावा लागणार नाही.

2007 मध्येही घरभाड्यावर कर लावण्यात आला होता

भारतात आजही बहुसंख्य लोकांकडे घरे नाहीत. त्यामुळे घरभाड्यावर कर आकारणी हा अनेक वर्षांपासून कळीचा मुद्दा राहिला आहे. वर्ष 2007 मध्ये फक्त व्यावसायिक मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत घरभाड्यावर सेवा कर लागू करण्यात आला होता. त्यावेळीदेखील निवासी मालमत्ता करातून वगळण्यात आली होती. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर, घरभाडे करातून वगळण्यात आले होते.

( हेही वाचा: राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार )

…तरच लागणार जीएसटी

करविषयक अभ्यासक संकेत देसाई यांनी सांगितले की रुग्णालयातील रुग्ण खोलीचे भाडे हे दिवसाला पाच हजारापेक्षा अधिक असेल तर, पाच टक्के जीएसटी लागणार आहे. मात्र, यातून आयसीयूला वगळ्यात आले आहे. तसेच, हाॅटेलमधील रुमचे प्रति दिवस भाडे एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल. त्याठिकाणी 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. याआधी एक हजारापेक्षा कमी भाडे असलेल्या रुमला जीएसटी लागत नव्हता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.