पुण्यात घर घेणे महागणार; किमतींमध्ये ९ टक्क्यांनी वाढ

पुण्यात माहिती – तंत्रज्ञानाच्या अनेक कंपन्या हिंजवडीसह, पिंपरी-चिंचवडमधील रावेत, मोशी, ताथवडे आणि वाकड या भागांमध्ये असल्यामुळे या भागात सर्वाधिक गृहविक्री झाली आहे. वाढच्या मागणीनुसार सदनिकांच्या किमतींमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

( हेही वाचा : विमान प्रवास करणार आहात? मुंबई विमानतळ धावपट्टी ‘या’ दिवशी सहा तास बंद राहणार)

पुण्यातील सदनिकांच्या किमतींमध्ये ९ टक्क्यांनी वाढ

दरम्यान, दरवाढ होऊनही देशातील प्रमुख शहरांच्या तुलनेत मालमत्तेच्या किमती कमी असल्याचा दावा ‘द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायझरी’ या संस्थेकडून करण्यात आला आहे. ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉप टायगरने पुण्यासह मुंबई, हैदराबाद, बंगळूरु आणि चेन्नई आदी प्रमुख शहरांतील मालमत्तांच्या विक्रीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘रिअस इनसाइट रेसिडेन्शिअल: एप्रिल-जून २०२२’ या अहवालानुसार कर्जदरात झालेली वाढ आणि जागतिक भू-राजकीय तणावांमुळे वाढलेल्या साहित्याच्या किमतींमुळे पुण्यातील मालमत्तांच्या दरांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ नोंदिवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

३० जून २०२२ पर्यंत पुण्यात सदनिकांची किंमत सरासरी प्रतिचौरस फूट ५,४०० ते ५,६०० रुपये होती. पुण्यात मालमत्ताच्या दरात वाढ झाली असली, तरी मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यासारख्या भारतातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत मात्र या सदनिकांच्या किमती कमी आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here