रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर आता बॅंकेकडून गृहकर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. देशात गृहकर्जात वाढ झाल्यामुळे घरांच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहे. गृहकर्जाचे व्याजदर वाढल्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अहवालानुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये एप्रिल ते जून दरम्यान निवासी मालमत्तेच्या किमतीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाढते अपघात; आता वाहनांवर राहणार ITMS सिस्टिमची नजर)
गृहकर्ज महागले
रिअल इस्टेट कंपन्यांची संस्था क्रेडाई, रिअल इस्टेट कन्सल्टंट कॉलियर्स इंडिया आणि लायसेस फोरास यांनी हाऊसिंग प्राइस ट्रॅकर रिपोर्टनुसार मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. RBI ने नुकतीच रेपो रेटमध्ये ५० बेसीस पॉइंटची वाढ केली आहे. त्यामुळे अनेक बॅंकानी विविध कर्जांच्या दरात वाढ केली आहे.
घर घेणे महागणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घराच्या किमतीत ८ ते ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोलकात्यामध्ये ८ टक्के, बंगळुरूमध्ये ४ टक्के आणि मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या किमतीत १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याच्या मालमत्तांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. बॅंकाची गृहकर्जे महाग झाल्याने देशातील आठ शहरांसह मुंबई-पुण्यात घर घेणे महागणार आहे.
Join Our WhatsApp Community