एखाद्या जागेची मालकी बदलली, तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना (Electricity company) आहे. या निर्णयानुसार, महावितरणने आपल्या कर्मचाऱ्यांना जुन्या मालकाचे थकित वीज बिल (Overdue electricity bill) नवीन मालकाकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर परिमंडळातील आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत १ लाख १८ हजार ४९७ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे (Power supply arrears) कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून, त्यांच्याकडे १४७ कोटी २ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने थकबाकीदार ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे, जी ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत व्याज आणि दंड माफ करून थकबाकी भरण्याची संधी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद देण्यास BJP चा विरोध?)
महावितरणने (Mahavitaran) नागरिकांना सूचित केले आहे की जुनी जागा किंवा घर खरेदी करताना वीज बिलाची थकबाकी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण नवीन मालकी हक्कासोबत जुन्या थकबाकीचे उत्तरदायित्वही नवीन मालकाकडे येते. थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रासह विविध राज्यांतून अशी १९ प्रकरणे दाखल झाली होती, ज्यावर न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community