हनुमान चालीसा पठण करीत हिंदूंनी सोसायटीत होणारी बकऱ्यांची कुर्बानी रोखली

395
हनुमान चालीसा पठण करीत हिंदूंनी सोसायटीत होणारी बकऱ्यांची कुर्बानी रोखली
हनुमान चालीसा पठण करीत हिंदूंनी सोसायटीत होणारी बकऱ्यांची कुर्बानी रोखली

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा रोडच्या सोसायटीत होणारी बकऱ्यांची कुर्बानी हिंदूंनी रोखली आहे. हनुमान चालीसा पठण करीत आणि जय श्रीरामचे नारे देत हिंदू बांधवांनी कुर्बानीचा प्रकार हाणून पाडला आहे.

मीरा रोड येथील जे.पी इन्फ्रा या हायप्रोफाइल सोसायटीत कुर्बानीसाठी दोन बकरे आणण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला. मात्र, मोसीन शेख यांचे कुटूंब आपल्या कृतीवर ठाम राहिल्याने रहिवाशांनी आंदोलन सुरू केले. हनुमान चालीसा पठण करीत आणि जय श्रीरामचे नारे जोरदार विरोध दर्शवला. तसेच रहिवाशांनी काशिमीरा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.

(हेही वाचा – Water Shortage : मुंबईकरांनो, येत्या १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात)

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शेख कुटुंब मागे हटण्यास तयार न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सोसायटी नियमांच्या अंतर्गत कुठलाही रहिवासी सोसायटीत कुर्बानी देऊ शकत नाही. आम्ही असे घडू देणार नाही. जर असे घडले, तर संबंधितांना आम्ही अटक करू, अशी ग्वाही पोलिसांनी दिली. तसेच शेख यांना बकरे त्या ठिकाणाहून घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे वादावर पडदा पडला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.