मुंबई महापालिकेला बऱ्याचदा आरक्षित भूखंडाच्या पुनर्विकासात विकासक महापालिकेला देत असतो. परंतु अशा महापालिकेला प्राप्त होणाऱ्या आरक्षित भूखंडांची माहिती बऱ्याचदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नसते आणि अधिकारीही कधीही अशा जागेचा शोध घेत नाही. भायखळ्यामध्ये (Byculla) अशाच एका जागेचा शोध माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी लावला आणि तब्बल ९ वर्षे पाठपुरावा करत या जागेची मालकी महापालिकेच्या नावावर करून घेतली. आज या जागेवर तीन मजली विरंगुळा केंद्र, अभ्यासिका, वेल्फेअर सेंटरसह बहुउद्देशीय इमारत उभी राहत आहे. (Byculla)
जागा मागील अनेक वर्षांपासून पडिक
भायखळा (Byculla) पूर्व येथील शिवदास चापशी मार्गावर वॉलेस फ्लोर मीलची जागा होती. मिलची जागा बंद पडल्याने या जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जागेचा बदल निवासी क्षेत्रात करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या नियमानुसार अशा प्रकारचा पुनर्विकास करताना महापालिकेला सुविधा सेंटर म्हणून ५ टक्के जागा देण्याची अट आहे. त्यामुळे विकासकाने या जागेचा विकास निवासी इमारतींकरता करताना महापालिकेला ५ टक्के जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ही जागा मागील अनेक वर्षांपासून पडिक स्वरुपातच होती. (Byculla)
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal चा तंबूतून ५ कोटींच्या अलिशान घरापर्यंतचा प्रवास; वांद्र्यात खरेदी केले घर)
महापालिकेच्या या भूखंडाचा अधिकाऱ्यांना विसर
मात्र, सन २०१२मध्ये तत्कालिन काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या मनोज जामसूतकर यांनी या जागेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हा भूखंड महापालिकेचा असल्याचे कळाले. परंतु महापालिकेच्या निदर्शनास जेव्हा आणून दिले तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची कल्पनाच नव्हती. पण पुढे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ती जागा महापालिकेला विकासकाकडून ऍमिनिटी प्लॉट म्हणून प्राप्त झाल्याची नोंद मिळाली. पण विकासकाने ती जागा महापलिकेच्या नावे करून दिली नव्हती, त्यामुळे ती जागा तशीच विकासाअभावी पडून होती, ज्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधीच लक्ष दिले नव्हते. (Byculla)
वास्तूंच्या कामाचा शुभारंभ
मात्र, याबाबत सातत्याने पाठपुरावा करत जामसुतकर यांनी या जागेची जागेची मालकी महापालिकेच्या नावावर करायला भाग पाडली आणि ही जागा महापालिकेच्या मालकीची झाल्यावर आज यावर तिन मजली विरंगुळा केंद्राची भव्य वास्तू उभी राहत आहे. महापालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या अखत्यारित या विरंगुळा केंद्राच्या वास्तूंचे बांधकाम केले जात असून याचे कार्यादेशही जारी करण्यात आले. याचे कार्यादेश दिल्यानंतर या वास्तूच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका सोनम जामसुतकर आणि मनोज जामसुतकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून केले. (Byculla)
तब्बल ९ वर्षे सुरु होता पाठपुरावा
मनोज जामसूतकर यांनी याबाबत बोलतांना वॉलेस फ्लोर मिलच्या जागेवरील पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत महापालिकेला ही मोकळी जागा मिळाली होती. परंतु या भूखंडाचा विकास सोडा, त्या भूखंड आपला आहे याचीही कल्पना महापालिकेला नव्हती. मी जेव्हा महापालिकेच्या ई विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली तेव्हा त्यांना या भूखंडाबाबत कळाले. माझ्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीतील तीन ते साडेतीन वर्षे आणि सोनम जामसुतकर यांच्या कारकिर्दीतील पाच वर्षे आणि आता प्रशासकीय राजवटीतील एक ते दीड वर्षांच्या कालावधीत मी याचा पाठपुरावा सोडला नव्हता. (Byculla)
(हेही वाचा – J P Nadda आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपावर तासभर बैठक; अजित पवार अनुपस्थित)
इमारतींना ओसी दिले, पण भूखंड महापालिकेच्या नावे करून नाही घेतला
या भूखंडाचा जेव्हा विकास करायचा निर्णय घेतला तेव्हा या जागेची मालकी आपली नसल्याची बाब समोर आली. या जागेवरील इमारतींच्या बांधकामांना महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी दिले, पण महापालिकेला देण्यात येणाऱ्या ५ टक्के ऍमिनिटी प्लॉटच्या जागेची मालकी महापालिकेच्या नावावर करून घेतली नव्हती. विशेष म्हणजे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबत घेतलेला निर्णय हा महत्वाचा होता. अजोय मेहता यांनी या जागेची मालकी आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरु करा आणि विकास करण्यासंदर्भात आराखडा आणि निविदा प्रक्रियाही राबवण्याची प्रक्रिया सुरु राहू द्या, असे निर्देश इमारत देखभाल विभागाला दिले. विकास नियोजन विभागाचे अधिकारी व अधिकाऱ्यांसोबत या जागेची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र नोंदणी करून याचे स्वतंत्र पीआर कार्ड म्हणजेच महापलिकेच्या नावावर या मालमत्ताचे पेपर बनवण्यात आले. (Byculla)
अधिकाऱ्यांना दिले श्रेय
ज्यामुळे आज या जागेची मालकी आपल्या नावावर होताच, कंत्राटदार निवडीला जो काही विलंब होणार होता, तो कमी होऊन विकासाचे काम तात्काळ हाती घेण्यात येत आहे. तब्बल ९ वर्षांच्या प्रयत्नांनंतर या जागेची मालकी महापालिकेच्या नावावर होत आहे. याचा आनंद होत आहे. या तिन मजली इमारतीत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, विद्यार्थी अभ्यासिका कक्ष व वेल्फेअर सेंटर असतील. आज जरी मी या बहुउद्देशीय सेंटरचे बांधकाम होत असले तरी यासाठी वास्तूविशारद बोराळे, इमारत बांधकाम विभागाचे कामत, खराडे आणि त्या विभागांचे संबंधिक अधिकारी आदींचे सहकार्य लाभल्यानेच ही वास्तू उभारण्याचा मार्ग सुकर झाल्याचे जामसुतकर यांनी म्हटले आहे. ही वास्तू आमच्या पाठपुराव्यामुळे सुरु असले तरी याचे श्रेय अजोय मेहता आणि इमारत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही तेवढेचे जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Byculla)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community