C P Radhakrishnan महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या

250
C P Radhakrishnan महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या
C P Radhakrishnan महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Maharashtra News Governor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील, तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची (Haribhau Bagde) राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल?

राजस्थान – हरिभाऊ किसनराव बागडे
तेलंगणा – जिष्णू देव वर्मा
सिक्कीम – ओम प्रकाश माथूर
झारखंड – संतोष कुमार गंगवार
छत्तीसगड – रामेन डेका
मेघालय – सी एच विजयशंकर

सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार

आसामचे राज्यपाल श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मणिपूरच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बनवारीलाल पुरोहित यांचा पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून राजीनामा स्वीकारला आहे. वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील, त्या तारखांपासून कामकाज सुरू होईल.

कोण आहेत सीपी राधाकृष्णन ?

पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधाची सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य होते. तमिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.