Waqf Amendment Bill वर भाष्य केल्याने वसीमने शिविगाळ करत निवृत्त लष्कर अधिकाऱ्याला केली मारहाण

60
Waqf Amendment Bill वर भाष्य केल्याने वसीमने शिविगाळ करत निवृत्त लष्कर अधिकाऱ्याला केली मारहाण
Waqf Amendment Bill वर भाष्य केल्याने वसीमने शिविगाळ करत निवृत्त लष्कर अधिकाऱ्याला केली मारहाण

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका निवृत्त लष्कर अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी एका कॅबमधून प्रवास करताना वक्फ सुधारणा विधेयकावर (Waqf Amendment Bill ) भाष्य केले. त्यावेळी कॅब चालकाने प्रवास करणाऱ्या निवृत्त लष्कर अधिकाऱ्याला मारहाण करत शिवीगाळ केली. कॅब चालकाने गाडी थांबवून, त्याच्या काही मित्रांना बोलवत त्यांच्यासह सूर्य प्रताप सिंह (Surya Pratap Singh) यांना मारहाण केली. कॅब चालकाचे नाव वसीम असल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : Saudi Arabia ची भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी; Muslim नागरिकांची इस्लामी राष्ट्राकडूनच गोची 

ही घटना दि. ६ एप्रिल रोजी घडली असून निवृत्त लष्कर सूर्य प्रताप सिंह (Surya Pratap Singh) हे एका कॅबमधून कानपूरहून लखनऊला जात होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा घडलेला सर्व प्रकार व्हिडिओत रेकॉर्ड करण्यात आला. संबंधित व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते की, निवृत्त असणार्‍या लष्कर अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर चालताही येत नव्हते. व्हिडिओत निवृत्त अधिकारी धडपडत एका युवकाचा पाठलाग करताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Waqf Amendment Bill)

 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सूर्य प्रताप सिंह (Surya Pratap Singh) सध्या कानपूरातील (Kanpur) जिल्हा सैनिक पुनर्वसन कल्याण मंडळातील (Sainik Kalyan Vibhag ) अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ही घटना दि. ४ एप्रिलला रात्री अचलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद मार्ग चौकात घडली. (Waqf Amendment Bill)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.