रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅपवरून अलिकडे बहुतांश नागरिक व्यवहार करतात. या व्यवहारांना चालना मिळावी यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅपला चालना मिळावी यासाठी तब्बल २६०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरून मुंबईत येताहेत विदर्भाचे वाघ! )
केंद्र सरकारडून नेहमीच डिजिटल व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जाते. हे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल देवाणघेवाण प्रक्रिया ही सोयीची व्हावी यासाठी २६०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षात रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅप वापरणाऱ्यांना सरकारकडून इंसेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. रुपे डेबिट कार्ड, भीम अॅपला चालना देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट प्रक्रियेला अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.
रुपे डेबिट कार्ड आणि भीम अॅपद्वारे व्यवहार केल्यास काय फायदा मिळणार?
- रुपे डेबिट कार्डाद्वारे व्यवहार केल्यास ०.४ टक्के इंसेंटिव्ह (परतावा) मिळेल.
- भीम यूपीआयद्वारे २ हजार रुपयांपेक्षा कमी व्यवहार केल्यास ०.२५ टक्के इंसेंटिव्ह मिळेल.
- भीम यूपीआयद्वारे इंडस्ट्रीसाठी होणाऱ्या डिजिटल व्यवहारावर ०.१५ टक्केंचा परतावा मिळेल.
Join Our WhatsApp Community#Cabinet approves the incentive scheme for promotion of RuPay Debit Cards and low-value BHIM-UPI transactions (P2M)#CabinetDecisions pic.twitter.com/C9ioM4fJf2
— Satyendra Prakash (@DG_PIB) January 11, 2023