Cabinet Meeting : ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता; महाराष्ट्रात पहिला सेमीकंडक्टर चिप्स प्रकल्प उभा राहणार

320
Cabinet Meeting : ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता; महाराष्ट्रात पहिला सेमीकंडक्टर चिप्स प्रकल्प उभा राहणार

राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे आरआरपी या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत महाराष्ट्रात सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा पहिला एकात्मिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Cabinet Meeting)

याप्रकल्पामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी १२ हजार कोटी रुपये एवढी गुंतवणूक होणार असून चार हजारपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प सुरू होणार आहे. (Cabinet Meeting)

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या प्रकल्पात उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर, फळाचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक धोरणानुसार सामूहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत विविध प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. (Cabinet Meeting)

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते. (Cabinet Meeting)

मान्यता मिळालेले गुंतवणूक प्रकल्प
  • जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लि., यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्पासाठी गुंतवणुक. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार असून पाच हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. (Cabinet Meeting)
  • जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार आणि एक लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.
  • हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. या प्रकल्पात दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. (Cabinet Meeting)
  • आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून याद्वारे आठ हजार पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.
  • परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये १ हजार ७८५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. (Cabinet Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.