Cabinet Meeting : बोरिवलीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

221
Cabinet Meeting : बोरिवलीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
  • प्रतिनिधी

अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुलुंड, कांजूरमार्ग येथील मिठागराची जमीन देण्यापाठोपाठ आता बोरिवली तालुक्यातील आक्से आणि मालवणी येथील जागा देण्याचा निर्णय गुरुवारी (१० ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – Pune : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु; पुण्यातून ७२९ ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना)

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांची गणना जशी जशी निश्तित होईल, त्याप्रमाणे धारावी पुनर्विकास प्राधीकरण यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे यातील आवश्यक जमिनीची मागणी करावयाची आहे. या मिळकतीस जमीन महसूल अधिनियम त्याचप्रमाणे सरकारने वेळोवेळी घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय लागू राहतील. यासाठी सुमारे १४० एकर क्षेत्रापैकी वाटपासाठी उपलब्ध होणारे क्षेत्र धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष हेतू कंपनीकडून घरे बांधण्यासाठी या जमिनीची प्रचलित बाजार मूल्याच्या १०० टक्के किंमत वसूल करून ती धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्यात येणार आहे. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – Bhagoji Keer, Nana Shankarsheth यांच्या स्मारकांच्या भूमिपूजनाचा मुहूर्तच जुळून येईना)

यापूर्वी ३० सप्टेंबरच्या बैठकीत धारावीतील अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाने या संदर्भात झोपडपट्टीचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून पात्र आणि अपात्र झोपडपट्टी धारकांची संख्या निश्चित करावयाची आहे. त्याप्रमाणे त्यांच्यासाठी किती जमीन लागेल, तेही निश्चित करायचे आहे. क्रेडिट लिंक सबसिडी अंतर्गत राज्य सरकारवर कोणत्याही आर्थिक दायित्व येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. या दायित्वाची जबाबदारी विशेष हेतू कंपनीची राहील. हे धोरण अन्य कोणत्याही प्रकल्प लागू होणार नाही, असे मंत्रिमंडळाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. (Cabinet Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.