Cabinet Meeting : प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पडणार महागात; ‘या’ शिक्षेची असणार तरतूद

61
Cabinet Meeting : प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पडणार महागात; 'या' शिक्षेची असणार तरतूद
  • प्रतिनिधी

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. संबंधित वास्तूंची हानी आणि पावित्र्य भंग करणे यामुळे चांगलेच महागात पडणार आहे. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – Cabinet Meeting : राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ)

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील गड किल्ले जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बिंदू ठरत आहेत. शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीत लढायांचा इतिहास हे गड किल्ले देत असतात. त्यामुळे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर व्यसनाधीन तरूण मद्यपान, ड्रग्ज किंवा आक्षेपार्ह घटना करत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. शासनाने अशा कृत्याला कायदेशीर लगाम लावण्यासाठी आता दोन वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – तिरुपती प्रकरणी प्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापणार- Supreme Court)

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम १९६०-६१ च्या महाराष्ट्र अधिनियम तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. (Cabinet Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.