मुंबई प्रतिनिधी
देशासह राज्यभरात आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic treatment by Ministry of AYUSH) पद्धतीवर भर दिला आहे. आपल्या ग्रंथ, गीता, पुराणात आयुर्वेदाचे महत्व सांगितले आहे. राज्यातील आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Union Minister Prataprao Jadhav) यांनी केले. दरम्यान, आयुष मंत्रालयामार्फत राज्यातील सुमारे १ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास पाच कोटी लोकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होईल. तसेच राज्यात लवकरच आयुष मंत्रालय केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील बीकेसीमधील सोफीटल हॉटेलमध्ये आयुष मंत्रालयाचा वैद्यकीय मूल्य प्रवास परिषद आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रासह राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Union Minister Prataprao Jadhav)
आयुष मंत्रालयाचा चार टप्प्यात कार्यक्रम होणार आहेत. मुंबईतून या कार्यक्रमाची सुरूवात झाली आहे. शेवटचा मेगा कार्यक्रम दिल्लीत होईल. राज्यातील महाविद्यालय, डॉक्टर, संस्थाचालक, विद्यार्थी आणि युवकांकडून आयुर्वेदबाबत विविध नवनवीन संकल्पना सुचविण्यात येत आहेत. देशात आयुर्वेद चिकित्सक उपचार पद्धतीला एकेकाळी फार महत्व होते. मागील काही काळात ते मागे पडले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा आयुर्वेद उपचार पद्धतीला महत्व दिले आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालय सुरू केले आहे. आपली आयुर्वेद उपचार पध्दत विदेशात पोहोचली आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून ही प्रगती केली आहे. भारतात परदेशातील लोकांना देखील आयुर्वेदाचे उपचार, दर्जेदार सेवा सुविधा देता येतील अशी यंत्रणा उभी करण्याबरोबरच प्रचार आणि प्रसार करण्यावर भर द्यायला हवा. आयुष मंत्रालयाने राज्यात १ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने सहकार्य करून सोशल माध्यम वापरात आणून एक एॅप तयार केल्यास या माध्यमातून ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे जाधव यांनी म्हटले. (Union Minister Prataprao Jadhav)
आयुर्वेदिक डॉक्टरांनी नावापुढे वैद्य लावावे
आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नावापुढे वैद्य लावावे. जेणेकरून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार होईल. शिवाय, प्रत्येकाला आयुर्वेदिक डॉक्टरांची माहिती मिळेल. अन्यथा लोक आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा होमिओपॅथिक डॉक्टर समजतील, असे जाधव म्हणाले.
(हेही वाचा – Muslim Child Marriage : १३ वर्षाच्या मुलीचा लावला निकाह ,मौलानासह १२ जणांवर गुन्हा दाखल )
कॅन्सर, हृदयविकारावर देखील आयुर्वेदिक उपचार
कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांच्यासह विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार आहेत. परंतु, आयुर्वेदिक उपचार घेण्याऐवजी रुग्ण होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेतात. मात्र, काही फरक न पडल्यास आयुर्वेदिक उपचार सुरू करतात. आरोग्यावर परिणाम होऊन ते बरे होतात. त्यामुळे सुरुवातीपासून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जाधव यांनी केले.
सलाईन, इंजेक्शन आयुर्वेदिक पद्धत आणा
ग्रामीण सह शहरी भागातील रुग्णांमध्ये इंजेक्शन आणि सलाईन लावून घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. याच धर्तीवर आयुर्वेदिक सलाईन, इंजेक्शन पध्दत आणावी. जेणेकरून रुग्ण होमिओपॅथी ऐवजी आयुर्वेदिक उपचार घेतील, असे त्यांनी सांगितले.
मोबाईल अॅपद्वारे ऋतुचर्या माहिती पोहोचवा
आयुर्वेदिक वैद्यकीय पद्धत लोकापर्यंत पोहोचण्यासाठी एक अॅप तयार करावे. नोटिफिकेशन द्वारे हे अॅप वापरकर्त्यांपर्यंत ऋतुचर्यातील आहार आणि दिनक्रम कसा असावा याची माहिती पोहोचवावी, असे आवाहन जाधव यांनी केले.
(हेही वाचा – Anis : जादूटोणा कायद्याची शासकीय समिती त्वरित बरखास्त करा; समस्त वारकरी संप्रदायाची मागणी)
राज्यात आयुष मंत्रालय केंद्र सुरू करणार
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात आयुष मंत्रालय (Ministry of AYUSH) केंद्र सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच केंद्र सुरू होईल. औषध, उपचार पद्धत, योगासन यांच्यासह आदी महत्वाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community