राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती.
(हेही वाचा – Andheri Gokhale Railway Flyover : दुसरी तुळई रेल्वे भागावर २५ मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वी)
सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही. अशा ३६ हजार ९७८ केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे पारेषण विरहित (बॅटरीसह) सौर संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. महाऊर्जामार्फत या संदर्भातील कार्यवाही होईल. अंगणवाडी केंद्रातील बालकांना शिक्षणाकरिता साहित्य देण्यात येते. अशावेळी वीज सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासाठी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ५६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. (Cabinet Meeting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community