Cabinet Meeting : पूर्णा नदीवर दहा साखळी बंधारे; ५३४ कोटींच्या खर्चाला सरकारची मान्यता

147
Cabinet Meeting : पूर्णा नदीवर दहा साखळी बंधारे; ५३४ कोटींच्या खर्चाला सरकारची मान्यता
  • प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत. या कामांसाठी ५३४ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. तसेच, बकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – Cabinet Decision : तीन ऑक्टोबर ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करणार)

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड हा आत्महत्याग्रस्त तालुका आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी येथील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा, याकरिता सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पूर्णा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १० बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. या साखळी बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊन पीक उत्पादनासाठी शाश्वत सिंचनाची साधने उपलब्ध होतील. तसेच दुष्काळावर मात करून जलस्रोतांचे मोठे बळकटीकरण होण्यास होईल. भूजल पातळीत मोठी वाढ होईल, असे म्हटले होते. सरकारने त्यानुसार सहा उच्च पातळी बंधारे आणि चार कोल्हापूरी असे दहा बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंधाऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातील १२ गावांमधील १ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. (Cabinet Meeting)

(हेही वाचा – केंद्रीय परराष्ट्रमंत्री S Jayshankar जाणार पाकिस्तानात  )

बकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मंजूरी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. किकवी पेयजल प्रकल्पाचे माती धरण, सांडवा, पाणी पुरवठा काम विद्युत विमोचक आणि अनुषंगीक कामांना मान्यता दिली. या कामांची विखंडीत केलेली निविदा मुळ अटी व शर्तीनुसार पुनरुज्जिवीत करण्यात येईल, असा सरकारचा दावा आहे. (Cabinet Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.