राज्यात पुन्हा निर्बंध? सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा

99

मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांसह राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. याबाबतच चर्चा करण्यासाठी आता सोमवारी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असून, राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करावेत का, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संध्याकाळी 4 वाजता मंत्रालयात मंत्रींमंडळ बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात येणआर असून, नवी नियमावली तयार करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः मुंबईत कोरोनाचा विस्फोट… राज्यातील आकडेवारी जाणून घ्या)

कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी मुंबईत ९६१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातही एका दिवसात नव्या कोरोना रुग्णांची नोंद १ हजार ४९४ पर्यंत पोहोचल्याने रुग्ण बरे होण्याचा टक्का पुन्हा घसरला आहे. राज्यात आता रुग्ण वाढीचे प्रमाण ९८.०४ टक्क्यांवर नोंदवले गेले आहे. राज्यात आता ६ हजार ७६७ कोरोना रुग्णांवर विविध जिल्ह्यांत उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.