आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली एक अनुपम देणगी आहे. आज जगभरात आयुर्वेदाला प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे असलेल्या आयुर्वेदातील ज्ञानाला नवसंशोधनाची जोड दिल्यास जगाचे कल्याण होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Cabinet Minister Nitin Gadkari) यांनी आयुर्वेदाचे महत्त्व सांगितले आहे.
आयुर्वेदतज्ज्ञ श्री गुरु बालाजी तांबे यांनी आपल्या संशोधनातून या क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांचे मार्गदर्शन आणि वारसा लाभलेल्या आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मालविका तांबे आणि सुनील तांबे यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी आयुर्वेदाचे महत्त्व, बलस्थाने, नव्या संधी आणि आव्हाने या विषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
(हेही वाचा – One Bharat Sari Walkathon : मुंबईत 5 हजारहून अधिक महिलांनी मिरवली साडी )
आयुर्वेदातील चांगल्या गोष्टींना बळ देण्याची गरज
पुण्याजवळच्या कार्ला येथील संतुलन आयुर्वेदाला आता ४० वर्षे झाली आहेत. यावेळी नितीन गडकरी यांनी डॉ. बालाजी तांबे यांच्या आयुर्वेदातील मोठ्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. आजच्या जीवनशैलीने उद्भवणाऱ्या आजारांवरील उपाय आणि आरोग्य रक्षणासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, आयुर्वेदातील चांगल्या गोष्टींना बळ देण्याची गरज आहे. आयुर्वेद क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिंनी आता पारंपरिक ज्ञान आणि नवसंशोधनाच्या माध्यमातून नवनिर्मिती करावी. या औषधांच्या प्रसारामुळे जगभरातील जनतेचे कल्याण होईल, असे मतही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community