मुंबई-ठाण्यात धावणार Cable Taxi ; परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत

204
मुंबई-ठाण्यात धावणार Cable Taxi ; परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत
मुंबई-ठाण्यात धावणार Cable Taxi ; परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची एक बातमी समोर आली आहे. मुंबईसह ठाण्यात लवकरच केबल टॅक्सी सुरु होणार आहे. महाराष्ट्राचे नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केबल टॅक्सीचे (Cable Taxi) संकेत दिले आहेत. मुंबई ठाण्यातील नागरिकांची वाहतुककोंडीतून सुटका करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी हा पर्याय शोधला आहे. त्यामुळे केबल टॅक्सीच्या (Cable Taxi) प्रकल्पाकडे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिले जाते.

( हेही वाचा : डिजिटल भारत योजनेंतर्गत गावकऱ्याला मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’; महसूलमंत्री Chandrasekhar Bawankule

सध्या भारतात अशी कुठलीच केबल टॅक्सीची सुविधा नाही. मात्र परदेशात अनेक ठिकाणी केबल टॅक्सीची सुविधा आहे. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर प्रकल्पावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर लवकरच मुंबई – ठाणेकरांना प्रवासासाठी नवीन साधन उपलब्ध होऊ शकतं. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याआधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचं उत्तम साधन असल्याचं सांगितलं होतं.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, केबल टॅक्सी सुविधा ही मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वाहतुकीसाठी लोकप्रिय पर्याय ठरू शकते. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी नाही. ही केबल टॅक्सी (Cable Taxi)१५ किंवा २० सीटरची असेल. त्यामुळे वाहतुककोंडीतून मुंबईकरांची सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो, तर केबल टॅक्सी चालवण्यास कोणतीही समस्या नाही. केबल टॅक्सीसाठी रोप वे बनवण्यासाठी अधिक जमीनीची गरज लागणार नाही, असे ही सरनाईक म्हणाले. (Cable Taxi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.