कल्याण येथे अवयवदान नेमके झाले कसे? जाणून घ्या…

ठाणे येथील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा रस्त्यावर अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. शनिवारी कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्‍यानंतर त्याची आई आणि भावाने त्याचे अवयवदान करण्यास संमती दिली. या अवयवदानामुळे यावर्षी मुंबई व नजीकच्या परिसरातील 40 वे अवयवदान पार पडले.

पुन्हा जागरुकता निर्माण करण्याची गरज

रुग्णाच्या कुटुंबियांना अवयव दानाबद्दल, अवयवदानासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या लोकांचे जीवन कसे वाचवण्यास मदत होते याबाबत माहित होते. त्यांनी दानासाठी संमती दिल्यानंतर हृदय, यकृत व मूत्रपिंड अवयवप्रत्यारोपणाकरिता मिळाले. रुग्णाच्या पश्चात त्याची सात वर्षांची मुलगी, पत्नी, आई-वडील, लहान भाऊ व मोठी बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गमावण्याचे दुःख पचवून हा निर्णय घेतल्याबद्दल रुग्णालयाच्या सुविधा संचालक डॉ. सुप्रिया अमेय यांनीही कुटुंबीयांना धन्यवाद दिले. कोविड-१९ मुळे तात्पुरत्या थांबलेल्‍या अवयव दानाबद्दल पुन्हा एकदा जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. अवयव दानामुळे प्रगतीशील परिवर्तनाच्‍या दिशेने वाटचाल करण्‍यास गती मिळते, अशी प्रतिक्रिया डॉ. सुप्रिया अमेय यांनी दिली.

(हेही वाचा राहुल गांधींच्या वक्तव्याचा हिंदू महासभेकडून निषेध, टिळक भवनावर काढणार मोर्चा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here