चैतन्य महाप्रभू (Caitanya Mahaprabhu) यांचा जन्म बंगालमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव जगन्नाथ आणि आईचं नाव शचीदेवी असं होतं. चैतन्य हे लहानपणापासूनच खूप खोडकर होते आणि त्यांना नृत्याची आवड होती. शिक्षणात त्यांचे फारसे लक्ष नव्हते. हरिनाम जप आणि भजन ऐकले की ते नाचू लागायचे. त्यांना एक मोठा भाऊ होता. त्यांच्या भावावर त्यांचा खूप जीव होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या भावामध्ये वैराग्याची भावना उत्पन्न झाली आणि ते ईश्वरभक्ती करण्यासाठी घर सोडून निघून गेले. त्यावेळी चैतन्य फक्त सहा वर्षांचे होते. आपल्या भावाच्या दूर जाण्याने ते खूप दुखावले गेले. त्यांच्यातला खोडकरपणा अचानक शांत झाला.
चैतन्य अकरा वर्षांचे असताना त्यांचे वडील देवाघरी गेले. त्यानंतर आपल्या आईच्या सांगण्यावरून चैतन्य महाप्रभू यांनी पंडित गंगादास यांच्या पाठशाळेत प्रवेश घेतला. त्या पाठशाळेत त्यांनी दोन वर्षे व्याकरण आणि पुढची दोन वर्षे साहित्याचा अभ्यास केला. त्यानंतर मग पंडीत विष्णू मिश्र यांच्याकडे स्मृती आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि मग पुढची दोन वर्षं पंडीत सुदर्शन मिश्र यांच्याकडे षडदर्शनाचा अभ्यास करून मग पंडित वासुदेव सार्वभौम यांच्या पाठशाळेत न्याय आणि तर्कशास्त्राचाही अभ्यास केला.
(हेही वाचा – Russia-Ukraine War : युक्रेन सैन्याने पाडली रशियाची लढाऊ विमाने )
एवढंच नव्हे तर अद्वैताचार्यांकडे चैतन्य महाप्रभू यांनी वेदपठण केलं, भागवताचा अभ्यास केला आणि ‘विद्यासागर’ ही पदवी मिळवली. त्यांच्यासोबत अध्ययन करणारे विद्यार्थी त्यांना ‘विद्वतश्रेष्ठ’ म्हणून संबोधायचे. शास्त्रार्थ करण्यात चैतन्य महाप्रभूरंगत होते.
चैतन्य महाप्रभु यांनी भजन आणि गायनाच्या नव्या शैली निर्माण केल्या. त्याकाळी देशामध्ये राजकीय अस्थिरता होती. तेव्हा त्यांनी जातिभेदाची भावना दूर करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या नामसंकीर्तनाचा प्रभाव आजही आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हणतात की चैतन्य महाप्रभू होते म्हणून वृंदावन तरले.
वैष्णव संप्रदायाचे लोक त्यांना राधा आणि कृष्णाचा एकत्रित अवतार मानतात. चैतन्य महाप्रभूंवर गोस्वामी, कृष्णदास कविराज, चैतन्य भागवत आणि चैतन्य चरितामृत नावाचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या चोविसाव्या संन्यास घेतला आणि ते निलांचल येथे जाऊन राहू लागले. तिथे त्यांनी अठरा वर्षे जगन्नाथाची भक्ती केली. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’ हे नाव धारण केलं. त्यांनी वृंदावनात सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. त्या मंदिरांना ‘सप्तदेवालय’ म्हणूनही ओळखलं जातं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community