- विशेष प्रतिनिधी, मुंबई
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे. त्याअंतर्गत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. परिसर स्वच्छतेसोबतच प्रशासनाने पुढील १०० दिवसांत १०० शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
(हेही वाचा – Hill Stations : महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि शांत हिल स्टेशन कोणते?)
मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील चारकोप गाव येथे ‘सांसद स्वच्छता ड्राइव्ह’चे २४ जानेवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोयल (Piyush Goyal) बोलत होते. स्थानिक आमदार योगेश सागर, उप आयुक्त (परिमंडळ-७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर दक्षिण) मनिष साळवे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. गोयल यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली.
(हेही वाचा – Water Cut : मालाड लिबर्टी गार्डनजवळील जलबोगद्याला गळती; शुक्रवारी रात्रीपासूनच तातडीने कामाला सुरुवात)
‘परिसर स्वच्छतेसाठी प्रशासन प्रयत्न करत असते. पण, स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नसून शासन, प्रशासन आणि जनतेचे यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहे. स्वच्छ उत्तर मुंबईसाठी प्रत्येक घटकांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केले. तसेच या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसंदर्भातील माहिती जनतेपुढे सादर करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिले. दरम्यान, आमदार योगेश सागर यांनीही उपस्थितांना यावेळी संबोधित केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community