घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी; CM Eknath Shinde यांचे निर्देश

139
CM Eknath Shinde यांचा महत्त्वाचा निर्णय; राज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार

पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे सक्त निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (२६ जुलै) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामेही करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे.त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल घेत जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा – मंत्रीजी, हात खिशातून बाहेर; लोकसभा अध्यक्ष Om Birla भडकले)

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.आपल्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही महापालिका प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.