Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई

82
Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई
Canada Hindu Temple : कॅनडातील मंदिरावरील हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित; कॅनडा सरकारची कारवाई

कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिराबाहेर रविवार, ३ नोव्हेंबर तो मंदिराबाहेर खलिस्तानी दहशतवादी ध्वज फडकवताना दिसला. पील पोलीस मीडिया अधिकारी रिचर्ड चिन यांनी सांगितले की, पोलिसांना मंदिराबाहेरील हिंसाचाराशी संबंधित फुटेज सापडले आहेत. ते फूटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी निदर्शनात सहभागी होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासाअंतर्गत खलिस्तानी आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या निदर्शनांत सहभागी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्याचे नाव हरिंदर सोही असल्याचे सांगितले जाते. (Canada Hindu Temple)

(हेही वाचा – Hero MotoCorp ची सणासुदीच्‍या काळादरम्‍यान आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल)

हिंदू मंदिराबाहेर भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पील पोलिसांनी सांगितले की, मंदिराबाहेर हिंसाचार व्यतिरिक्त, त्याच्या आजूबाजूच्या इतर ठिकाणीही निदर्शने झाली आहेत. पोलिस प्रमुख निशान दुरैप्पा यांनी सांगितले की, त्यांना हल्ल्याची माहिती आधीच मिळाली होती. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना अटक करून शिक्षा केली जाईल.

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता. ते म्हणाले की, आम्हाला कॅनडाच्या सरकारकडून कारवाईची अपेक्षा आहे. अशा घटना आपल्याला कमकुवत करू शकत नाहीत. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडा सरकारला प्रार्थनास्थळांचे संरक्षण करण्याचे आवाहनही केले होते.

यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिरातील हिंसाचार स्वीकारता येणार नाही, असे म्हटले होते. या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. (Canada Hindu Temple)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.