कॅनडातील एडमंटन येथे स्वामीनारायण मंदिराची खलिस्तान्यांकडून तोडफोड करण्यासह मंदिराच्या भिंतीवर चित्रे काढून ती विद्रूप करण्यात आली. ही घटना २२ जुलैला घडली. कॅनडातील विश्व हिंदु परिषदेने ‘एक्स’वर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. या घटनेचा निषेध करत कॅनडा सरकारकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विहिंपकडून करण्यात आली आहे. कॅनडामध्ये यापूर्वी अनेक मंदिरांना खलिस्तान्यांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. (Canada Temple Attack)
(हेही वाचा- विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वैद्यकीय उपचार तातडीने मिळायलाच हवेत; Bombay High Court चे सरकारला निर्देश)
१. गेल्या वर्षी कॅनडातील मिसिसोंगा येथील श्रीराममंदिराची तोडफोड करून त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर टोरंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने या घटनेचा निषेध नोंदवला होता. तसेच दूतावासाने या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. (Canada Temple Attack)
२. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. (Canada Temple Attack)
३. यावर्षी जानेवारीमध्ये ब्रॅम्प्टन येथील एका मंदिराची विटंबना करण्यात आली होती. या मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. (Canada Temple Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community