Canada Temple Khalistani Threat : कॅनडातील खलिस्तान्यांकडून पुन्हा हिंदू मंदिर लक्ष्य; भारतीय वंशाच्या खासदाराने घेतली गंभीर दखल

कॅनडातील सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराला पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. रविवार, 26 नोव्हेंबर रोजी खलिस्तानींनी या मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

115
Canada Temple Khalistani Threat : कॅनडातील खलिस्तान्यांकडून पुन्हा हिंदू मंदिर लक्ष्य; भारतीय वंशाच्या खासदाराने घेतली गंभीर दखल
Canada Temple Khalistani Threat : कॅनडातील खलिस्तान्यांकडून पुन्हा हिंदू मंदिर लक्ष्य; भारतीय वंशाच्या खासदाराने घेतली गंभीर दखल

कॅनडातील सरे (surrey) येथील लक्ष्मी नारायण मंदिराला (lakshmi narayan temple) पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. रविवार, 26 नोव्हेंबर रोजी खलिस्तानींनी या मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक खलिस्तान समर्थक धमकी देताना दिसत आहे. हा व्हिडिओ कॅनडातील भारतीय वंशाच्या खासदार चंद्रा आर्य (Chandra Arya) यांनी याप्रकरणी ट्विट करून सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange : सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ; मनोज जरांगेंचे ठाण्यात आरोप)

खलिस्तान समर्थकांनी (Khalistanis in Canada) गेल्या आठवड्यात सरे बीसीमधील गुरुद्वाऱ्याबाहेर एका शीख कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यानंतर आठवडाभरात लक्ष्मी नारायण मंदिरावर करण्याची धमकी दिली आहे. कॅनडात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व केले जात आहे. मी कॅनडाच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून कारवाई करण्यास सांगत आहे, असे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत हिंदू मंदिरांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. हिंदू-कॅनेडियन विरुद्ध द्वेषाची भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा गोष्टी उघडपणे आणि जाहीरपणे चालू देणे मान्य नाही, असा इशारा चंद्र आर्य यांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी कॅनडात हरदीपसिंग निज्जर यांची सार्वजनिकरित्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे सरकार आणि पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजन्सी असल्याचा आरोप केला आहे. (Canada Temple Khalistani Threat)

ऑगस्टमध्ये याच मंदिराची तोडफोड

ऑगस्ट २०२३ मध्येच काही खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली होती. त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजावर प्रक्षोभक पोस्टरही चिकटवले होते. या पोस्टर्समध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचे छायाचित्र घेतले आहे.

हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

२०२३ च्या जानेवारीमध्ये कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू मंदिर, फेब्रुवारीमध्ये मिसिसॉगा येथील राम मंदिर आणि ओंटारियोच्या विंडसर येथील स्वामी नारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. मंदिरांवरील या हल्ल्यांचा मुद्दा कॅनडाच्या संसदेतही मांडण्यात आला होता; पण तेथील सरकार किंवा पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (Canada Temple Khalistani Threat)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.