Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी स्वस्तिक चिन्हाबाबत केले वादग्रस्त विधान

174
Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी स्वस्तिक चिन्हाबाबत केले वादग्रस्त विधान
Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी स्वस्तिक चिन्हाबाबत केले वादग्रस्त विधान

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी हिंदुच्या स्वस्तिक चिन्हावरून वादग्रस्त आणि संतापजनक विधान केलं आहे. ‘X’या सोशल मिडियाद्वारे संसदेजवळ द्वेषयुक्त चिन्ह प्रदर्शित करण्याची परवानगी देऊ शकत नाही, असे त्यांनी लिहिले आहे.

त्यांनी सोशल मडिया ‘X’वर स्वस्तिक चिन्हाबाबत (swastika symbol) असे लिहिले आहे की, जेव्हा आपण द्वेषयुक्त भाषा आणि प्रतिमा पाहतो किंवा ऐकतो, तेव्हा आपण त्याचा निषेध केला पाहिजे. पार्लमेंट हिलवर एखाद्या व्यक्तीने केलेले स्वस्तिक प्रदर्शन अस्वीकार्य आहे. कॅनेडियन लोकांना शांततेत एकत्र येण्याचा अधिकार आहे; परंतु आम्ही यहूदीविरोधी, इस्लामोफोबिया (Islamophobia) किंवा कोणत्याही प्रकारचा द्वेष सहन करू शकत नाही.

(हेही वाचा – Happy Birthday Damian Maia : मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट डेमियन माइया )

सोशल मिडियावर ट्रुडो यांच्या या वक्तव्यावर सोशल मिडियावर अनेकांनी टिका केली असून स्वस्तिक हे पावित्र्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे, तर नाझींचं चिन्ह असलेलं हेकेनक्रुझ (उलटा स्वस्तिक) हे द्वेषाचं प्रतिक असल्याचं म्हणत ट्रुडो यांच्या विधानाला विरोध केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.