Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

158
Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा; भाजपा खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

भाजपा खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी (CP Joshi) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून राहुल गांधी यांचा पासपोर्ट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच अमेरिकेत मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यावर भाजप सातत्याने आक्षेप घेत आहे. आता त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याचीही मागणी होऊ लागली आहे. सीपी जोशी हे राजस्थानच्या चित्तोडगडमधील भाजपा खासदार आहेत.

(हेही वाचा – Legal Advisor Salary : कायदेविषयक सल्लागाराचं नेमकं काम काय? त्याला मासिक किती पगार मिळतो? )

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात सीपी जोशी यांनी म्हटले आहे की, राहुल गांधींनी परदेशी भूमीवर केलेली विधाने ‘देशविरोधी’ आहेत. त्यांचे भारतीय नागरिक म्हणून वर्तन संशयास्पद आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशाच्या अंतर्गत स्थैर्याला, सीमांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना हानी पोहोचू शकते. परदेशी भूमीवर भारतीय उद्योगपतींविरोधात वक्तव्ये करणे हा देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. सीपी जोशी यांनी राहुल गांधींवर खलिस्तानी अजेंडाचा प्रचार केल्याचा आरोपही केला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि ते या पदावर कायम राहिल्यास त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा. राहुल गांधी भविष्यात परदेशात जाऊन भारतविरोधी मोहीम सुरू करू शकतात, जे देशाच्या शांतता आणि परराष्ट्र धोरणासाठी घातक ठरू शकते, असा सीपी जोशी यांचा आरोप आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.