AC Local Train : प्रवाशांचे हाल सुरूच! पश्चिम रेल्वेवर वाढीव वातानुकूलीत फेऱ्यांसाठी साध्या लोकल रद्द

232
AC Local Train : प्रवाशांचे हाल सुरूच! पश्चिम रेल्वेवर वाढीव वातानुकूलीत फेऱ्यांसाठी साध्या लोकल रद्द

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून खार ते सांताक्रुझदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यानंतर आता (AC Local Train) एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांच्या प्रवासात अडथळे निर्माण होणार आहेत.

यापुढे पश्चिम रेल्वेवर (AC Local Train) एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १७ वाढीव लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र, या लोकल फेऱ्या साध्या फेऱ्या रद्द करून चालवण्यात येणार असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होणार आहे.

(हेही वाचा – Special Railway: दिवाळीच्या मुहूर्तावर कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ही’ विशेष रेल्वे सुरू)

प्रवाशांची मागणी वाढल्याने चर्चगेट ते डहाणू रोडदरम्यान १७ एसी लोकल फेऱ्या (AC Local Train) सुरू करण्यात येत आहेत. एसी लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा विरोध नाही. एसी लोकल प्रवासी सेवेत दाखल करताना नव्या स्वरूपात आणाव्यात. साध्या लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी एसी लोकल आणल्यास त्यास विरोध करण्यात येईल, अशी भूमिका प्रवाशांसह प्रवासी संघटनांची आहे. यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या (AC Local Train) वाढीव १७ लोकल फेऱ्यांमुळे १७ साध्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. यामुळे प्रवाशांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.