ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या (Cancer Fake Medicines) यकृताचे औषध डिफिटेलियो आणि कर्करोगावरील इंजेक्शन एडसेट्रिसच्या बनावट आवृत्त्या मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी यापुढे औषधं लिहून देतांना काळजी घेण्याचे निर्देश DCGI ने दिले आहेत. तसेच, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना या औषधांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधांबाबत (Cancer Fake Medicines) अलर्ट जारी केला होता. यानंतर, DCGI ने 5 सप्टेंबर रोजी सांगितले की, टेकडा फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेडद्वारे निर्मित 50 mg एडसेट्रिस इंजेक्शनच्या अनेक बनावट आवृत्त्या भारतासह चार देशांमध्ये उपलब्ध आहेत. ही औषधे सहसा रुग्णाला वैयक्तिक आधारावर उपलब्ध करून दिली जातात, पुरवठा प्रामुख्याने ऑनलाइन उपलब्ध असतो.
डीसीजीआयने राज्य औषध (Cancer Fake Medicines) नियंत्रकांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार, या औषधाच्या किमान आठ वेगवेगळ्या बनावट आवृत्त्या बाजारात उपलब्ध आहेत.
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लवकरच आठपदरी होणार; MSRDC चा शासनाकडे प्रस्ताव)
युनायटेड नेशन्स (UN) च्या आरोग्य संस्थेने दिलेल्या एका अहवालानुसार, डेफिटेलिओ औषधाच्या बनावट (Cancer Fake Medicines) आवृत्तीच्या वापरामुळे रुग्णावरील उपचारांवर कोणताही चांगला परिणाम होत नाही शिवाय त्यामुळे अनेक गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. अनेकदा या औषधाच्या सेवनाने रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.ही माहिती समोर आल्यानंतर डीसीजीआयने डॉक्टरांना रुग्णाला औषध देताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रुग्णाला याबाबत जागरुक करण्याची सूचना केली, जेणेकरुन औषधाची काही रिएक्शन आल्यास रुग्ण तात्काळ रुग्णालयात येईल.
डीसीजीआयने राज्य आणि प्रादेशिक प्राधिकरण अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना जारी करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन या (Cancer Fake Medicines) औषधांची विक्री, वितरण आणि बाजारातील साठा यावर लक्ष ठेवता येईल. यासोबतच बाजारात उपलब्ध औषधांचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचेही सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community