महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात कर्करोग आणि क्षयरोगासारख्या घातक विकारांचे तत्काळ निदान उपलब्ध होणार आहे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागात हिस्टोपॅथॉलॉजी विभाग सुरू झाला आहे. गंभीर विकारांच्या तात्काळ निदानासाठी हा विभाग महत्त्वाचा असतो.
कर्करोग आणि क्षयरोगासारख्या उपचारांसाठी अनुक्रमे परळ येथील टाटा रुग्णालय आणि वडाळा येथील पालिकेचे क्षयरोग रुग्णालय आहे. आजाराच्या नमुने तपासणीसाठी बरेचदा रुग्णांना पालिकेच्या विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात किंवा मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जावे लागायचे. आता सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात हिस्टोपॅथॉलॉजीची सेवा उपलब्ध झाल्याने कुपर आणि नायर रुग्णालयाचा भार बऱ्यापैकी कमी झाला आहे.
(हेही वाचा – Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरने पाठवला विक्रम लँडरचा पहिला फोटो, इस्रो म्हणाले Smile Please)
हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय?
हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे उतींचा अभ्यास. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णांच्या शरीरातून तपासणीसाठी उती काढून घ्याव्या लागतात. उतींची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते. रोगाचे निदान करून संबंधित रुग्णाच्या आजारावर योग्य उपचार करण्यासाठी या विभागाची मदत होते. पालिका उपनगरीय रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात गंभीर आजाराच्या नमुने तपासणीची सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधी क्रिसना लॅब आणि आणि कूपर रुग्णालयात अहवाल पाठवायले जायचे. या दोन्ही ठिकाणांवरील रुग्णसेवेचा ताण आता कमी झाला आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी विभाग उपलब्ध नाही. या रुग्णालयातील रुग्णांचे नमुने व्ही. एन. देसाई रुग्णालयात पाठवता येतील, असे अधीक्षक डॉ. हरभजन सिंग बावा यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community