Bharat Gogwale : राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही, भरत गोगवले यांची स्पष्टोक्ती 

143
Bharat Gogwale : राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही, भरत गोगवले यांची स्पष्टोक्ती 
Bharat Gogwale : राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही, भरत गोगवले यांची स्पष्टोक्ती 

सूरत-गुवाहाटी-गोवा (Surat-Guwahati-Goa) असा प्रवास करून शिंदे गटाने भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. सत्तेत आल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी अजित पवार यांनी निधी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. पण, अजित पवार शिंदे-भाजपा सरकारच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यातील राजकारणात 2022 साली मोठा भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आता शिंदे गटातील काहीजण उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असली तरीही भविष्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार का? यावर महाडचे आमदार भरत गोगावले ( Bharat Gogwale) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी भाष्य केलं आहे.

(हेही वाचा – Crime : पोलीस हवालदाराने केली अंमली पदार्थाची तस्करी, वाचा नेमकं प्रकरण काय ? )

यावेळी ते म्हणाले की, याबद्दल काहीच सांगू शकत नाही. राजकारण आणि खेळात काय घडेल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांचा स्वभाव फार वेगळा आहे. ते कुणाला अडचणीत टाकत नाहीत. कुठल्याही प्रसंगात असल्यावर एकनाथ शिंदे यांच्या मदत मागितली, तर ते मदत करणारच.

उद्धव ठाकरेंकडून मातोश्रीची दारे उघडी असतील का ? या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल बाळासाहेब काय बोलायचे, हे सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे राजकारणात अजून काय घडेल, याबाबत काहीच सांगता येत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.