Veer Savarkar यांच्याशिवाय आपण मराठीचा विचार करू शकत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

33
Veer Savarkar यांच्याशिवाय आपण मराठीचा विचार करू शकत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

जेव्हा आपण मराठीचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय (Veer Savarkar) आपण मराठीचा विचार करू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला जी शब्दांची माया दिली, जो शब्दकोष त्यांनी दिला, शब्दांचा खजिना दिला. त्यामुळे निश्चितपणे हा एक चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुणे (Pune) येथे तिसऱ्या विश्व मराठी संमलेनाचे (pune vishwa marathi sahitya sammelan) उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

(हेही वाचा – आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमलेन आहे, याच आपल्या सर्वांना आनंद आहे. त्या निमित्ताने मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो. मधु मंगेश कर्णिक यांचा आपण सत्कार केला. भारत सरकारने पद्यश्री किताब यापूर्वी दिला आहे. कथा, कांदबरी, ललित, कविता, नाटक, चरित्र- आत्मचरित्र सगळ्या गोष्टी साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तीने निर्माण केले, असं सृजनशील व्यक्तीमत्व चौथ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरु केली, ते नाबाद 93 अशा मधु मंगेश कर्णिक यांनी खऱ्या अर्थाने मराठीला समृद्ध केलं, त्यांचा सत्कार करताना आपल्या सर्वांना अतिशय आनंद होतोय” असं देवेंद्र फडणवीस या प्रसंगी म्हणाले.

वाद-विवाद, प्रतिवाद झाला पाहिजे

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन फडणवीस म्हणाले की, मगाशी उदय सामंत तुम्ही म्हणालात की, काही लोकांनी वाद तयार केले. साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो. विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही, तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद निर्माण करणे, हा आपला स्थायी भाव आहे. आपण संवेदनशील लोक आहोत. वाद-विवाद, प्रतिवाद झाला पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थाने मंथन होऊ शकते, हे मी म्हणत नाही. आठव्य शतकात कुवलय माला नावाच एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात मराठीमाणसाचे वेगवेगळे गुण-अवगुण सांगितले आहेत. त्यात एक चॅप्टर आहे, मराठी माणसाला कलह करायला आवडतो, असं आठव्या शतकात लिहून ठेवलय. त्यामुळे तुम्ही फार काळजी करु नका. अशा प्रकारची संमलेन आपण करत रहायची. कुणी नाव ठेवेल, कुणी चांगलं म्हणेल. त्यातून मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती, बुद्धी मिळते”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.