कॅप्रि ग्लोबल कॅपिटलची परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज योजना 

गृहनिर्माण हा राष्ट्राच्या कल्याणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य मार्गदर्शन आणि निधीचा सुलभ अॅक्सेस यामुळे सरकारचे सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांचे व्हिजन साकार करणे शक्य आहे.

171

शहरी आणि ग्रामीण भागात परवडणाऱ्या घरांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कॅप्रि ग्लोबल कॅपिटल लि. (सीजीसीएल) या वेगाने प्रगती करणाऱ्या आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि गृह कर्जांवर भर देत असलेल्या एनबीएफसीतर्फे प्राइम ही परवडणाऱ्या घरांसाठीची कर्ज योजना लाँच करण्यात आली. या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण ग्राहकांना वार्षिक ७.९९% पासून व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक व खासगी कंपनीत काम करणारे पगारदार कर्मचारी हे कर्ज घेऊ शकतील. शहरी विभागात महिलांना व्याजदरात ०.१०% सवलत मिळणार आहे.

चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी योजना 

भारतात, परवडणार्‍या गृहनिर्माण विभागात परवडणार्‍या कर्जाची उपलब्धता खूपच कमी आहे, कठोर कर्ज धोरणांमुळे लोकांना कर्ज घेणे कठीण जाते. गृहनिर्माण हा राष्ट्राच्या कल्याणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य मार्गदर्शन आणि निधीचा सुलभ अॅक्सेस यामुळे सरकारचे सर्वांसाठी परवडणाऱ्या घरांचे व्हिजन साकार करणे शक्य आहे. लवचिक, ग्राहकानुरूप आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या परवडणारी पेमेंट यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या गृहकर्जदात्यांच्या कस्टमर्स शोधात असतात. सरकारी कर्मचारी, सार्वजनिक व खासगी कंपन्यांमध्ये किमान एक वर्ष काम करणाऱ्या आणि चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. बांधकाम झालेल्या घराची पुनर्खरेदी (रिसेलमधील घर) करणे, आधीपासून असलेल्या जमिनीवर घरबांधणी, रिनोव्हेशन, राहत्या घराचे अपग्रेडेशन यासाठी कर्जाची रक्कम वापरता येऊ शकते.

(हेही वाचा :आता आणखी कडक निर्बंध… काय असू शकतात नवे निर्णय? )

महामारीच्या आधीच चांगल्या घराची मागणी  

भारतातील विविध गृहयोजनांच्या आवश्यकतेबद्दल माहिती देताना कॅप्रि ग्लोबल कॅपिटल लि.चे व्यवस्थापकीय संचालक राजेश वर्मा म्हणाले, “या महामारीच्या आधीसुद्धा अधिक चांगल्या घराची गरज आणि मागणी होती. अजूनही अनेक जण निम्न-दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या, गर्दीच्या ठिकाणी राहतात आणि अनेक जण तर बेघर आहेत. परवडणाऱ्या घरांसाठी पुरेसे लाभ देऊ केले तर या टार्गेट ग्रुपचा आकार पाहता या क्षेत्राला प्रचंड फायदा होऊ शकतो. या क्षेत्रातील मागणी व पुरवठा यातील दरी कमी करण्यासाठी आणि सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सर्व घटकांना लाभदायी ठरणारी परिसंस्था तयार करण्यासाठी आरबीआय आणि नॅशनल हाउसिंग बँक (एनएचबी) यांसारख्या सरकारी व नियामक संस्थांनी अनेक उपक्रम राबविले. सीजीसीएलमध्ये आम्ही सतत ग्राहकांच्या मागण्यांबद्दल संशोधन करतो, त्यांच्या गरजा समजून घेतो आणि त्यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी कस्टमाइझ्ड सेवा देऊ करतो. परवडणारी, स्थिर आणि बऱ्यापैकी दर्जा असलेली घरे न परवडू शकणाऱ्यांसाठी निवारा उपलब्ध व्हावा यासाठी आमची वैविध्यपूर्ण उत्पादने आणि घरांसाठी असलेल्या खास योजना आहेत. पुढील पाच वर्षात गृहक्षेत्राची वाढ होईल आणि चालना मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.