Shubham Gupta Martyred : घरी लग्नाची तयारी; कॅप्टन शुभम गुप्ता यांचे दहशतवाद्यांशी दोन हात आणि कुटुंबावर शोककळा

Shubham Gupta : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान हुतात्मा झाले. चकमकीत एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाले. जे दोन कॅप्टन हुतात्मा झाले त्यातील एक शुभम गुप्ता होते.

189
Shubham Gupta Martyred : घरी लग्नाची तयारी; कॅप्टन शुभम गुप्ता यांचे दहशतवाद्यांशी दोन हात आणि कुटुंबावर शोककळा
Shubham Gupta Martyred : घरी लग्नाची तयारी; कॅप्टन शुभम गुप्ता यांचे दहशतवाद्यांशी दोन हात आणि कुटुंबावर शोककळा

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवानांचा मृत्यू, ३ जवानांना हौतात्म्य, या बातम्या दर काही दिवसांच्या अंतराने येत असतात. त्यांचे परिणाम किती भीषण असतात, हे दर्शवणारी घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना कॅप्टन शुभम गुप्ता (Captain Shubham Gupta) यांना हौतात्म्य आले. या घटनेची माहिती कळताच शुभम गुप्ता यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण शुभम गुप्ता यांच्या लग्नाची तयारी त्यांच्या घरी सुरु होती.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : सुनील प्रभूंनी व्हीप पाठवलाच नव्हता; महेश जेठमलानींचा थेट आरोप )

जम्मू-काश्मीर दहशतवाद्यांशी चकमक

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टनसह अन्य दोन जवान हुतात्मा झाले. चकमकीत एका मेजरसह अन्य एक जवान जखमी झाले. बाजीमालच्या जंगलात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. जे दोन कॅप्टन हुतात्मा झाले त्यातील एक शुभम गुप्ता होते.

आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

मुलगा घरी येईल आणि त्याचे लग्न होईल, याची वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय आता शुभम गुप्ता यांच्या पार्थिवाची वाट बघत आहेत. शुभम गुप्ता यांना वीरमरण आल्याची बातमी आली आणि त्यांच्या आईची शुद्ध हरपली. त्यांचे वडील वसंत गुप्ता म्हणाले, ”मी जेव्हा जेव्हा शुभमला लष्कराच्या गणवेशात बघायचो, तेव्हा मला अभिमान वाटायचा. तो घरी आला की, आम्ही त्याचे लग्न करणार होतो.”

(हेही वाचा – Central Railway : हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान )

भावाला अश्रू अनावर

शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांचा भाऊ ऋषभ म्हणाला की, ”शुभम जेव्हा गुप्त मोहिमेवर जात असे, तेव्हा त्याचा फोन बंद असायचा. देशावर दादा (शुभम गुप्ता) खूप प्रेम करायचा. सुरुवातीपासूनच शुभमला देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून तो लष्करात गेला. लष्कराचा गणवेश लहानपणापासून त्याला आवडायचा.” कॅप्टन शुभम गुप्ता (Shubham Gupta) यांच्या आठवणीने भाऊ ऋषभलाही अश्रू अनावर झाले.

आग्र्याचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री एस. पी. बघेल यांनी शुभम गुप्ता यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. (Shubham Gupta Martyred)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.