मुंबई-पुणे महामार्गावर गाडी पेटली! 

कामशेत बोगद्याजवळ या कारमधून अचानक धूर येऊ लागला. त्याच वेळी प्रसंगावधान बाळगून चालक शेख यांनी त्वरित कार थांबवून ते बाहेर आले. त्यानंतर कारमधील अन्य सर्व बाहेर पडले.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एका कारला आग लागली. ही घटना गुरुवारी, 20 मे रोजी ठिक दुपारी तीन वाजताच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ घडली. विशेष म्हणजे ही गाडी कामशेत बोगद्याच्या नजीक ही घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गावरून ही कार जात होती. सोमाटणे टोल नाक्यापासून 69 किलोमीटर अंतरावर असताना ही कार अति गरम झाली आणि इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने कार बाजूला घेतली. कार थांबवून चालक कारमधून खाली उतरला असता कारने पेट घेतला. काही वेळात ही आग विझवण्यात आली, मात्र तोपर्यंत आगीत कार पूर्ण जळून गेली.

(हेही वाचा : नौदलाप्रमाणे इथेही राबवले बचाव कार्य! ६ जणांचे वाचवले जीव!)

जीवितहानी टळली!

मिळालेल्या माहितीनुसार मुद्दतसर शेख हे २० मे रोजी त्यांच्या कुटुंबासह पुण्याहून मुंबईला एमएच ०२ सीएच ९३८७ या क्रमांकाच्या कारमधून निघाले होते. त्याच वेळी कामशेत बोगद्याजवळ या कारमधून अचानक धूर येऊ लागला. त्याच वेळी प्रसंगावधान बाळगून चालक शेख यांनी त्वरित कार थांबवून ते बाहेर आले. त्यानंतर कारमधील अन्य सर्व बाहेर पडले. मात्र त्यानंतर लगेचच गाडीने पेट घेतला आणि काही वेळातच कार जाळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच आयआरबीचे बचाव पथक आणि अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी हजर झाली. यामुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here