- विशेष प्रतिनिधी, मुंबई
काही मॉल्स्, उपाहारगृहे, व्यापारी संकुले आदी ठिकाणी मंजूर बांधकाम नकाशानुसार वाहनतळाचा (Car Parking) वापर न करता त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जातो, अशा वास्तुंवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) पावसाळ्यानंतर करावयाच्या विविध कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवार ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी आढावा घेतला. महानगरपालिका मुख्यालय इमारतीत झालेल्या या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्यासह सहआयुक्त, परिमंडळ उप आयुक्त, २४ प्रभागांचे सहायक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – MLA Vikas Thakre यांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले ‘मविआ’ आणि ‘काँग्रेस’मध्येच छुपे गद्दार)
सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) या मुद्दयावर चर्चा करताना भूषण गगराणी म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून मध्य मुंबई, पश्चिम मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहनतळ (Car Parking) सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. वाहनतळाच्या माध्यमातून महसूल संकलन करणे हा महानगरपालिकेचा उद्देश नसून नागरिकांना वाहनतळ सुविधा विनासायास उपलब्ध करणे हा हेतू आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल अॅप विकसित केला जात आहे. वाहनतळ सुविधेबरोबरच बेकायदा वाहनतळ, रस्त्यांवर वाहने लावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विभाग कार्यालय, पोलिस अंमलदार आणि महानगरपालिकेची वाहतूक मध्यवर्ती यंत्रणा आदींनी समन्वयाने सातत्याने कारवाई करावी, जेणेकरून वाहतुकीस शिस्त लागेल. शॉपिंग मॉल्स्, उपाहारगृहे, व्यापारी संकुले आदी व्यावसायिक आस्थापनांनी इमारत बांधकाम परवाना घेताना वाहनतळाची (Car Parking) तजवीज दाखवून महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे.
(हेही वाचा – BMC 7’th Pay : महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढीव भत्त्यांची रक्कम मिळणार सप्टेंबर २०२४ पासूनच)
मात्र, काही ठिकाणी वाहनतळांच्या (Car Parking) जागा बंदीस्त करून त्याचा व्यावसायिक वापर केला जात आहे. अशांवरदेखील कठोर कारवाई केली पाहिजे. वाहनतळाच्या जागांचा इतर कारणांसाठी केला जाणार वापर रोखायला हवा. या कामी शहर अभियंता व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करावी व तात्काळ कठोर कारवाई करावी, असेही आयुक्तांनी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community