इलेक्ट्रिक कार ही भविष्यातील वाहतूक असणार आहे. पण सध्या पेट्रोल- डिझेल कारची मागणी कमी झालेली नाही. मोठ्या कंपन्या पारंपारिक कारचे उत्पादन वाढवण्यासाठी 21 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहेत. अशा कारच्या मागणीत वाढ झाली असून, नवीन कार खरेदीसाठी 22 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागत आहे. आठ लाखांहून अधिक गाड्यांची डिलिव्हरी बाकी आहे. त्यात 99 टक्के पेट्रोल-डिझेल कार आहेत.
ई- वाहनांना बूस्टर मिळेना
- एप्रिल- सप्टेंबरदरम्यान देशात 18 हजार 142 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.
- दुसरीकडे या कालावधीत 19 लाख 36 हजार 740 कारची विक्री झाली. नवीन कार विक्रीत ईव्हीचा वाटा 0.93 टक्के आहे.
( हेही वाचा: फक्त २० रुपयात २ लाखांचा विमा; सरकारच्या या योजनेतून तुम्हाला होईल मोठा फायदा! )
जगभरात काय?
अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा वापर करत आहेत.
या कंपन्या वेटिंगवर
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅंड महिंद्रा, किय मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा यांसारख्या कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेल कारला मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे.
Join Our WhatsApp Community