गुजरातच्या (Gujarat ) अहमदाबादमध्ये एका ८ वर्षीय मुलीचा शुक्रवारी (10 जाने.) हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यू झाला. शाळेत असताना या विद्यार्थिनीच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. त्यामुळे शिक्षकांनी तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. 24 तासांत गुरुवारी (९ जाने.) कर्नाटकच्या (Karnataka) चामराजनगर जिल्ह्यातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. (Cardiac Arrest)
हेही वाचा-नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई दरम्यान धावणार Vande Bharat Express
अहमदाबादमधील एका खासगी शाळेत शिकणारी गार्गी रानपारा ही मुलगी शुक्रवारी सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचली होती. पायऱ्या चढत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले. वेदना झाल्यामुळे ती लॉबीतील बेंचवर बसली आणि काही सेकंदांत जमिनीवर पडली. (Cardiac Arrest)
हेही वाचा-National Human Trafficking Awareness Day : राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिनाचे महत्त्व काय आहे?
मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावली, परंतु रुग्णवाहिका शाळेत पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे गार्गीला कर्मचाऱ्यांच्या गाडीतून नेले. मात्र रुग्णालयात जाईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Cardiac Arrest)
हेही वाचा-Republic Day Parade पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात गुरुवारी असाच एक प्रकार घडला. येथील सेंट फ्रान्सिस शाळेतील ८ वर्षांची तेजस्विनी वर्गात शिक्षकांना वही दाखवण्यासाठी बेंचवरून उठली, मात्र जागेवरच बेशुद्ध झाली. तेजस्विनीने भिंतीचाही आधार घेतला, मात्र ती जमिनीवर कोसळली. शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचेही प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटकाच असल्याच डॉक्टरांनी सांगितले. (Cardiac Arrest)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community