आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द

51
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द

आंतरराष्ट्रीय स्तराचे उत्तम अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) निधन झाले. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. देशाच्या आर्थिक विकासातील योगदान अतुलनीय आहे. राजकीय प्रवास हा अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा थक्क करणारा आहे. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते.

(हेही वाचा – चित्रपट चित्रिकरणाच्या सर्व अनुमतींसाठी एक खिडकी योजना सुरु करा; Ashish Shelar यांचे निर्देश)

मनमोहन सिंग यांची शैक्षणिक कारकीर्द

मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतल होते. १९५७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी घेतली. १९६२ त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापिठातून अर्थशास्त्रात डी. फिल केलं. तसंच त्यांनी इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली. या विद्यापीठात राइट्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचं पुस्तकही लिहिलं. त्यांनी लिहिलेले अनेक लेख अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.

मनमोहन सिंग यांची कारकीर्द
  • १९५७ ते १९५९ – अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता
  • १९६३ ते १९६५ – प्राध्यापक
  • १९६६ – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
  • १९६६ ते १९६९ – UNCTD सोबत काम
  • १९६९ ते १९७१ – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक, परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती
  • १९७२ – अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार (CHIEF ECONOMIC ADVISER)
  • १९७६ – अर्थ मंत्रालयात सचिव होते
  • १९७६ – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक
  • १९८२ ते १९८५ – RBI चे गव्हर्नर (Governor of RBI)
  • १९८५-१९८७ – नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष
  • १९८७ ते १९९० – दक्षिण आयोगाचे महासचिव
  • १९९१ – केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष
  • २००४ – २०१४ – भारताचे पंतप्रधान (Manmohan Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.