शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे (Thane) यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती प्रीत्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरिबा नज्जार, आर्या घैसास आणि यज्ञेश्वर पाठक हे यंदाचे विजेते ठरले. जेष्ठ व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर, भगवान दास, सतीश खोत, शैलेश साळवी आणि महेश कोळी या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा भरवली जाते.
या स्पर्धेसाठी आलेल्या आणि परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन, यशस्वी मराठी उद्योजक डिझायनर आणि शिवसेवाचे हितचिंतक दीपक पेंडूरकर यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, या स्पर्धेतील व्यंगचित्रांच्या उत्तम दर्जाबद्दल मंडळाचे कौतुक केले.
(हेही वाचा – Bus Ticket : एसटी, रिक्षा- टॅक्सीचा प्रवास महागणार ; १५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी)
स्पर्धेचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ हास्य व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी विवेक मेहेत्रे यांनी उपस्थित कलाकारांना व्यंगचित्र रेखाटनात “विसंगती” या शब्दातील प्रत्येक अक्षराची उकल करत चित्राचा दर्जा कसा उंचावता येतो, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या जीवनात रेखाटलेल्या कायम लक्षात राहिलेल्या चित्रांचा उल्लेख करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या शाबासकीस पात्र ठरलेल्या चित्रांची सविस्तर माहिती दिली.
या स्पर्धेचे परीक्षण करताना आलेले अनुभव आणि उत्तम पद्धतीने भावी व्यंगचित्रकारांनी मांडलेले सामाजिक विषय, तसेच गेली बारा वर्ष या स्पर्धेतील व्यंगचित्रांच्या दर्जाचा वाढता आलेख यावर जेष्ठ चित्रकार मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे एक ज्येष्ठ परीक्षक शैलेश साळवी यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी चित्रकला, पोस्टर आणि व्यंगचित्रकला यातील फरक स्पष्ट केला आणि या वर्षी शिवसेवा मित्र मंडळातर्फे विविध शाळांमध्ये आयोजित व्यंगचित्र कार्यशाळेत आलेले अनुभव सांगितले. कमलिनी कर्णबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका माया कुलकर्णी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मंडळ आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक यांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यंगचित्राबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली, यासाठी कौतुक केले.
या स्पर्धेच्या नियोजनात मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष परब, सचिव सुभाष करंगुटकर, खजिनदार अमित ताम्हनकर, ज्येष्ठ सदस्य अक्षर पारसनीस, हेमंत प्रधान मंडळाचे सदस्य अजित पेडणेकर, आनंद गुरव, मंगेश कारभारी, प्रशांत मोहिले, आणि शंकर गौर यांचे सहकार्य मिळाले, या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले आणि आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश राजे यांनी केले.
शिवसेवा आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला २०२५ या स्पर्धेचे विजेते
दिव्यांग गट
- हरिबा नज्जार : प्रथम पारितोषिक
- रिया कनोजिया : द्वितीया पारितोषिक
- कल्पना पटवा: तृतीय पारितोषिक
- उत्तेजनार्थ
सन्नी मौर्या
अथर्व गायकवाड
भाग्यश्री दांडगे
आनंदी कनोजिया
शिवम
सोनाक्षी संतोष काळे
हसन खान
गट: बाल व्यंगचित्रकार
- प्रथम पारितोषिक :आर्या घैसास
- द्वितीय पारितोषिक :स्वरा नलमवार
- तृतीय पारितोषिक :ईश्वरी पवार
- उत्तेजनार्थ
गौरी गुप्ता
सई मयेकर
मयांक थोरात
सायली राणे
आयुष आपटे
काव्या सावंत
लोकेश कनोजिया
गट: हौशी व्यंगचित्रकार
- प्रथम पारितोषिक : यज्ञेश्वर पाठक
- द्वितीय पारितोषिक : चेतन मंडलिक
- तृतीय पारितोषिक : योगेश चव्हाण
उत्तेजनार्थ
संदीप शिंदे
नितीन गोखले
प्रशांत नार्वेकर
डॉ अभिजीत त्रैलोक्य
भगवान पाटील
शरद महाजन
आनंद अंकुश
उत्कृष्ट सहभागासाठी…
- कमलिनी कर्णबधिर विद्यालय ठाणे पूर्व
- झवेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालय ठाणे
- शेठ ईश्वरदास भाटिया विद्यालय, कुर्ला
- सरस्वती विद्यालय, नौपाडा ठाणे
यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (Thane )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community