‘मोनोरेल’चे चीफ ऑपरेटिंग अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. डी.एल.एन. मूर्ती यांच्याविरुद्ध सोमवारी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

152

‘मुंबई मोनोरेल’चे चीफ ऑपरेटिंग अधिकारी डॉ. डी.एल.एन. मूर्ती यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. एका कंत्राटदाराचे पेमेंट रिलीज करण्यासाठी मूर्ती यांनी २० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप याप्रकरणी मूर्ती यांना अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी यांनी दिली.

‘मुंबई मोनोरेल’कडून दोन कोटी १० लाखांचे बिल

‘मुंबई मोनोरेल’मध्ये ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या कंपनीला २०१९ ते २०२० मध्ये साफसफाई आणि हाऊसकिपिंगचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीने सदरचे काम कंत्राटप्रमाणे ऑगस्ट २०२०मध्ये पूर्ण झाले, कंपनीच्या कामाचे बिल एकूण दोन कोटी ५० लाख आणि सिक्युरिटी रक्कम ३२ लाख रुपये किंमती झाले होते, त्यापैकी ‘मुंबई मोनोरेल’कडून दोन कोटी १० लाखांचे बिल आणि सिक्युरिटी रक्कमपैकी २२ लाख जून २०२१ मध्ये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम मिळण्यासाठीची फाईल मोनोरेल चे चीफ ऑपरेटिंग अधीकारी डॉ. डी. एल. एन. मूर्ती यांनी स्वतःजवळ ठेवून फाईल पुढे पाठवण्यासाठी २० लाख रुपयांची लाच ‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’कंपनीचे मालकाकडे मागितली होती. या प्रकरणी कंपनीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपासात डॉ. डी.एल.एन. मूर्ती यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. डी.एल.एन. मूर्ती यांच्याविरुद्ध सोमवारी भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.

(हेही वाचा : एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.