राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध चंदननगर (Chandannagar) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महेश आनंदराव कदम (Mahesh Anandrao Kadam) (वय ४८, रा. मतेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडापाव विक्रेत्याविरुद्ध राष्ट्रीय सन्मानांचा अपमान प्रतिबंधक कायद्यान्वये २ (जी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (National Flag)
( हेही वाचा : ख्रिस्ती धर्मांतराचा डाव Hindu संघटनांनी उधळला; २ पाद्रींसह ७ जणांना अटक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडापाव विक्रेता वडगाव शेरी (Vadgaon Sheri) भागात राहायला आहे. वडगाव शेरी भागात तो वडापाव विक्रीची गाडी लावतो. तक्रारदार महेश कदम (Mahesh Anandrao Kadam) हे वडापाव खाण्यासाठी गेले होते. कदम यांनी त्याला वडापाव (Vada Pav) बांधून देण्यास सांगितले. वडापाव विक्रेत्याने कदम यांना राष्ट्रध्वजाचे (National flag) चित्र असलेल्या कागदात वडापाव गुंडाळून दिला. कदम यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत. (National Flag)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community