सोशल मीडियावर औरंगजेबाचे (Aurangzeb) उदात्तीकरण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या २२ जणांविरुद्ध अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या २२ जणांपैकी ११ जण अल्पवयीन आहेत.
( हेही वाचा : कर्नाटकातील Congress सरकारचे हलाल बजेट; मुसलमानांना कोट्यवधींची वाटली खैरात)
अक्कलकोटचे (Akkalkot) आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर ठेवून समाजात तेढ निर्माण केली जात असल्याबद्दल विधानसभेत आवाज उठविला होता. या विषयाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आणि पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. अक्कलकोट उत्तर व अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याअंतर्गत (Akkalkot South Police Station) २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट (Akkalkot) उत्तर पोलिस ठाण्यात याबाबतीत एक गुन्हा तर अक्कलकोट (Akkalkot) दक्षिण पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मैंदर्गी (Maindargi) येथील १४ जणांवर तर नाविदगी येथील एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. मैंदर्गी येथील १४ पैकी आठजण अल्पवयीन आहेत. तर, दुसऱ्या गुन्ह्यात तिघे अल्पवयीन आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात (Akkalkot Assembly constituency) जाणीवपूर्वक धार्मिक विद्वेष पसरण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीची दखल घ्यावी, अशी मागणी सत्ताधारी आमदार कल्याणशेट्टी यांनी केल्याने खळबळ माजली होती. धार्मिक द्वेष, तेढ निर्माण करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा जाणीवपूर्वक वापर केला जातोय का, या अनुषंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत. (Aurangzeb)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community