एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याप्रकरणी Kunal Kamra विरोधात गुन्हा दाखल

137
एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याप्रकरणी Kunal Kamra विरोधात गुन्हा दाखल
एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याप्रकरणी Kunal Kamra विरोधात गुन्हा दाखल

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची (Unicontinental Studios) तोडफोड केली. याशिवाय कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) गुन्हाही दाखल झालेला आहे.

( हेही वाचा : School : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शाळा

दरम्यान कुणाल कामराने (Kunal Kamra) ज्या स्टुडिओमध्ये त्याचा ‘शो’ आयोजित केला होता, त्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आमदार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेने आक्रमक होत इथून पुढे कुणाल कामराचा शो होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढताना दिसून येतायत. त्याने त्याच्या ‘शो’मध्ये थेट गद्दार असा उल्लेख केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही या प्रकरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. कुणाल कामराने (Kunal Kamra) “ठाणे की रिक्षा, चेहरे पे डाढी” असं एक गाणं आपल्या ‘शो’ मध्ये म्हटलं. या गाण्यातून कामराने (Kunal Kamra) एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) घणाघाती टीका केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.