आता उपराजधानीतही वाढतेय कोरोना रुग्णसंख्या

राज्यातील प्रमुख शहरांमधील रुग्णसंख्येचा आकडा वेगाने वाढत असताना आता नागपूरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. नागपूरात शनिवारपर्यंत रुग्णसंख्या शंभरीपार करेल, अशी दाट शक्यता आहे. राज्यातील सर्वच लहान लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज्यात आता १३ हजार ३ २९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

(  हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

एका दिवसांत ३ हजार ८१ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत केवळ १ हजार ३२३ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९६ टक्क्यांपर्यंत खालावले. दैनंदिन नोंदीत राज्यात एकट्या मुंबईत १ हजार ९५६ नवे कोरोना रुग्ण सापडले. ठाण्यात २२२, नवी मुंबईत २०१, पुण्यात १३५ कोरोना रुग्णाची नवी नोंद झाली.

राज्यात हजारीपार रुग्णसंख्या असलेले जिल्हे –

मुंबई – ९ हजार १९१
ठाणे – २ हजार १५७

राज्यात तीन आकड्यांवर रुग्णसंख्या असलेले जिल्हे –

पुणे – ८८४
रायगड – ४११

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here