Delhi High Court च्या न्यायमूर्तींच्या बंगल्यात सापडली रोख रक्कम; आग लागल्यावर अग्नीशमन दलाला सापडले घबाड

165

दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख पैसे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. घराला आग लागल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण केले असता घरातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. यशवंत वर्मा (Yashwant Verma) असे या न्यायमूर्तीचे नाव असून काही न्यायमूर्तीनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. जर वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) १९९९ च्या प्रक्रियेनुसार तपास सुरु करावा, अशी मागणीही केली आहे.

(हेही वाचा – World Poetry Day का साजरा केला जातो? आणि तुमची आवडती कविता कोणती आहे?)

सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच अलाहाबादच्या हायकोर्टात (Allahabad High Court) बदली करण्याची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेव्हा आग लागली, तेव्हा वर्मा हे दिल्लीत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना आणि अग्नीशमन दलाला बोलविले होते. आग विझवत असताना एका खोलीत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली. पोलिसांनी याची माहिती ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना दिली. तिथून सर्वोच्च न्यायालयाला याची सूचना देण्यात आली. वर्मा हे २०२१ मध्ये अलाहाबादहून दिल्लीत आले होते.

हा प्रकार समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तातडीची बैठक घेतली आणि त्यामध्ये बदलीची शिफारस करण्यात आली. न्यायाधिशांविरुद्धचा अहवाल आल्यानंतर कॉलेजियमची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. अंतर्गत चौकशीचाही विचार केला जात आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. (Delhi High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.