पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले असून लिंक न केल्यास पुढील वर्षापासून पॅनकार्ड बंद होऊ शकते. या निर्णयानंतर आता केंद्र सरकारमार्फत जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्यालाही आधार कार्डसोबत जोडण्याची योजना बनवली जात आहे.
( हेही वाचा : इंधन पेटले! लोक शेजारील राज्यात धावत सुटले… )
विविध योजनांचा लाभ घेता येणार
आधारकार्ड हे जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्याला लिंक केल्यास याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊन यामुळे विविध योजनांचा लाभ घेता येईल. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या बॅंक खात्यात शिष्यवृत्ती देण्याचे काम सरकार या माध्यमातून करणार आहे. यामुळे जवळपास ६० लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला लिंक केल्यास ऑटोमैटिक वेरिफिकेशन सिस्टीमद्वारे योग्य त्याच लाभार्थ्यांपर्यंत स्कॉलरशिप पोहोचण्यास सरकारला मदत होईल.
वेळेत स्कॉलरशिप मिळण्यास मदत
ऑटोमैटिक वेरिफिकेशन सिस्टीम याअंतर्गत केंद्र सरकार सर्वात आधी राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात स्कॉलरशिप देण्याचे काम करणार आहे. यामुळे जर जातप्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला आधार लिंक केला तर पात्र विद्यार्थ्यांना वेळेत स्कॉलरशिप मिळण्यास मदत होणार आहे. असा निर्णय सचिव आणि पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community