मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मेट्रो २ ए आणि मेट्रो 7 चे मार्गाचे लोकार्पण झाले. परंतु या मेट्रो स्थानकांवर खानपान सोय उपलब्ध नाही. आता मात्र प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे. कारण आता सर्व मेट्रो स्थानकांवर दुकानांची उभारणी करण्यात येणार आहेत. ४७० दुकाने बांधण्यात येणार असून या दुकानांच्या बांधणीला आता सुरूवात झाली आहे. महिन्याभरात ही खानपान सुविधा सुरू होईल.
( हेही वाचा : मेट्रो रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभिकरणावर महापालिकेचा भर )
४७० दुकानांना परवानगी
आरे ते दहिसर मार्गिकेवर कोणत्याही मेट्रो स्थानकांवर अद्याप खानपानाची सुविधा नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होत आहे. महिनाभरात खानपान सुविधा सुरू होणार असून ४७० दुकानांना परवानगी देण्यात आली आहे असे महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालक डी. के. शर्मा यांनी सांगितले. खानपान सुविधा सुरू झाल्यावर एमएमएमओसीएल, एमएमआरडीएला चांगला महसूल मिळेल.
दुकानांवर हे पदार्थ उपलब्ध होणार
- चहा
- कॉफी
- पिझ्झा
- बर्गर
- बेकरी पदार्थ