आता ITR भरण्यासाठीची मुदत वाढवली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार कर

145

आयकर भरण्यासाठी अनेकदा आवाहन करुन सुद्धा काही करधारक योग्य वेळेत कर भरणा करत नाहीत. त्यामुळे आयकर विभागाकडून कर भरणा करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची मुदत 7 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. यामुळे अजूनही कर भरणा न केलेल्या करदात्यांसाठी कर भरण्याची ही शेवटची संधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोबर करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा 7 नोव्हेंबरपर्यंत कर भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे.

(हेही वाचाः आता ITR भरणे अधिक सोपे होणार, फॉर्म्समध्ये बदल करण्यासाठी अर्थ मंत्रालयाचा प्रस्ताव)

सीबीडीटीचे नोटिफिकेशन

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(CBDT) कडून याबाबत एक नोटिफेकिशन जारी करत माहिती देण्यात आली आहे. याआधी ऑडिट रिपोर्ट सबमिट करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली होती. पण आता आयटीआरसाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे या नोटिफेकेशनमध्ये म्हटले आहे.

फॉर्म 10 ए भरण्यासाठीची मुदतही वाढवली

त्याचबरोबर सीबीडीटीने फॉर्म 10 ए भरण्यासाठीची मुदतही 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. हा फॉर्म आधी 30 सप्टेंबरपर्यंत इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरण्यास सांगितले गेले होते. करदात्यांच्या गरजा लक्षात घेऊनच फॉर्ण 10 ए भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.