अक्षय कुमारचा ‘OMG 2’ वादाच्या भोवऱ्यात; प्रदर्शनाची तारीख पुढे जाणार

141

अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे, पण तरी या चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद काहीं मिटायचं नाव घेत नाही. नुकतंच या चित्रपटाच्या सेन्सॉर सर्टिफिकेटबद्दल चर्चा सुरू होती. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २० कट सुचवल्याचं स्पष्ट केलं होतं. याबरोबरच चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळणार असल्याचीही चर्चा होती. परंतु CBFC च्या सदस्यांना चित्रपट पसंत पडला आहे.

हस्तमैथुन आणि लैंगिक शिक्षण याचा भगवान शंकराशी जोडलेला संबंध यावर प्रेक्षक कसे व्यक्त होतील याबद्दल सेन्सॉर बोर्डाचे सदस्य थोडे साशंक आहेत. यामुळेच आता CBFC ने चित्रपटाच्या निर्मात्यांना अक्षय कुमारची भूमिका बदलण्याचं सुचवलं आहे. ‘कोईमोई’च्या रीपोर्टनुसार अक्षय कुमार चित्रपटात शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याने अक्षय कुमारचं पात्र हे भगवान शंकर म्हणून न दाखवता ‘शंकराचा दूत’ म्हणून दाखवण्याचं CBFC ने सुचवलं आहे. याबरोबरच काही मीडिया रीपोर्टनुसार चित्रपटातील अक्षय कुमारचे काही संवाद आणि सीन्सही हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा Women Fighting : महिला वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल 

इतकंच नव्हे तर ‘ओह माय गॉड २’ हा ठरलेल्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही अशीही चर्चा) आहे. निर्मात्यांनी मात्र यावार अद्याप भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ठरलेल्या दिवशीच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार अशी शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.